Marathi Bhasha Gaurav Din 2025आनंद काटीकरआपला महाराष्ट्र आणि मराठी भाषा यांचा अभिमान आपल्या सर्वांनाच असतो. आपल्या भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे. आता पुढे काय करायला हवे, याविषयाची रूपरेखा मांडणारा लेख. आजच्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त..अभिजात भाषेच्या दर्जासाठी केंद्र सरकारने चार निकष ठरवलेले आहेत. हे चार निकष जी भाषा पूर्ण करेल, त्या भाषेला हा अभिजाततेचा दर्जा मिळेल, असे घोषित करण्यात आले. त्यानुसार आतापर्यंत २००४ मध्ये तमिळ आणि २००५ मध्ये संस्कृत भाषेला असा दर्जा मिळाला. त्यानंतर तेलुगु (२००८), कन्नड (२००८), मल्याळम (२०१३) आणि उडिया (२०१४) याही भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. आत्ता २०२४ मध्ये हे निकष सुधारित करण्यात आले आणि मग मराठीसोबत पाली, प्राकृत, बांगला आणि आसामी या भाषांनाही हा अभिजात दर्जा देण्यात आला. २०२४ चे नवीन सुधारित निकष पुढीलप्रमाणे –.१) त्या भाषेचा १५०० ते २००० वर्षे प्राचीन नोंदीकृत इतिहास असावा आणि त्या काळात साहित्यनिर्मिती झालेली असावी. २) प्राचीन साहित्य / ग्रंथांचा संग्रह, ज्याला त्या भाषकांच्या पिढ्या आपला वारसा मानतात. ३) ज्ञानग्रंथ, विशेषत: गद्यग्रंथ याव्यतिरिक्त कविता, पुरालेखीय आणि शिलालेखीय पुरावे. ४) ही अभिजात (शास्त्रीय) भाषा आणि त्यातील साहित्य त्या भाषेच्या सध्याच्या स्वरूपापासून वेगळे असू शकते किंवा त्याच्या शाखांच्या नंतरच्या प्रकारांशी विसंगत असू शकते.पूर्वी चौथा निकष अभिजात भाषेचे रूप आणि आजचे रूप यात समान धागा असावा, असा होता, मात्र तो निकष बदलल्यामुळे मराठीला अभिजात दर्जा मिळण्याचा मार्ग सुकर झाला. हाल सातवाहन काळात, म्हणजे सामान्यत: इसवीसन तिसऱ्या-चौथ्या शतकात लिहिला गेलेला ‘गाथासप्तशती’ हा अभिजात मराठी भाषेतील एकमेव ग्रंथ आज उपलब्ध आहे. .या संकलित ग्रंथातील माहाराष्ट्री प्राकृत ही भाषा मराठीचे आद्यरूप आहे, असे आपण अभिजात भाषेच्या अहवालात नोंदवले आहे. गाथा सप्तशती, विविध शिलालेख-ताम्रपट, महानुभाव साहित्य, विवेकसिंधू, ज्ञानेश्वरी इ. ग्रंथ, साधने यांतील मराठी बदलत गेलेली आहे, असे आपल्याला दिसते. म्हणजेच आपली अभिजात मराठी भाषा आजवर बदलत गेली आहे, हे लक्षात ठेवायला हवे. अभिजात भाषा म्हणून घोषित झालेल्या भाषांच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून मिळालेल्या निधीतून प्रामुख्याने प्राचीन भाषेच्या विकासाचे प्रकल्प सुरू केले गेले आहेत. या संदर्भात आपल्याला पुढे काय काय करावे लागेल यावर आता मंथन व्हायला हवे. त्यासंदर्भातील काही मुद्दे..१) नवीन पिढीला ही जुनी भाषा शिकवणे आवश्यक ठरेल. हे शिकवताना संस्कृत - प्राकृत - अपभ्रंश ही मालिकाही बघावी लागेल. त्या तीनही भाषांचा तौलनिक अभ्यास करावा लागेल. त्यामध्ये; भाषेची वैशिष्ट्ये नोंदवणे, व्याकरण अभ्यासणे, साम्यभेद शोधणे, शब्दसंग्रह पाहणे इत्यादी गोष्टी आवर्जून कराव्या लागतील.२) अभिजात मराठी आणि प्राकृत, अपभ्रंश भाषांतील विविध साहित्यकृती आधुनिक भारतीय आणि आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये रूपात रूपांतरित कराव्या लागतील. येथे बहुभाषिक मराठी माणसाला खूप काम मिळू शकेल..३) मराठीच्या विविध बोलींचे सर्वेक्षण करण्यासाठी निधी मिळेल. जॉर्ज गिअर्सन या इंग्रजी अधिकाऱ्याने १९१८ ते १९२६ दरम्यान केलेल्या भारताच्या भाषिक सर्वेक्षणानंतर पुण्यातील डेक्कन कॉलेजने २०१८ ते २०२४ या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील मराठी भाषेचे लघुसर्वेक्षण ‘महाराष्ट्राचा भाषिक नकाशा आणि मराठीच्या बोलींचे प्रतिमांकन’ या शीर्षकाखाली पूर्ण केले आहे. याचे उत्तम संकेतस्थळही तयार झालेले आहे. या प्रकारचे सर्वेक्षण संपूर्ण महाराष्ट्रात आणि मराठी माणसं ज्या ज्या प्रांतात जाऊन स्थायिक झाली तेथे जाऊन करणे आवश्यक आहे. त्यामुळे मराठीच्या आजवरच्या वाटचालीचा एक चांगला आलेख आपल्याला मिळू शकेल. त्याचबरोबर मराठी आणि अन्य भारतीय भाषांचा परस्परसंबंधही अधिक चांगल्या तऱ्हेने उलगडेल..४) आजच्या महाराष्ट्रात आणि बृहन्महाराष्ट्रात सापडणाऱ्या मराठीचे शिलालेख, ताम्रपट यांचे उत्तम संकलन आणि संवर्धन व्हावे. त्यांच्या प्रतिमा निर्माण करून प्रत्यक्ष आणि आभासी संग्रहालय तयार करावे. शिलालेख आणि ताम्रपटात लिहिलेल्या घटना, व्यक्ती, स्थाने यांची माहात्म्ये शोधून काढावी लागतील. तसे संशोधक तयार करावे लागतील.५) गावोगावी मराठीचे ऐतिहासिक संदर्भ नोंदवणारे लोक असावेत. नाणेघाट, इनामगाव (शिरूर), तेर(धाराशिव) इत्यादींसारख्या विविध पुरातत्त्व स्थानी उत्तम मार्गदर्शक प्रशिक्षित करावे..६) पर्यटनसंस्थांनी अशा अभिजात मराठीच्या सर्व स्थानांना स्पर्श करणाऱ्या नि योग्य ती माहिती देणाऱ्या सहलींचे नियोजन करावे. ही सहलसंकल्पना विकसित करावी. ७) मराठी भाषेत झालेले ऐतिहासिक बदल स्वतंत्रपणे सोदाहरण नोंदवून त्याआधारे विविध साहित्यकृती निर्माण होतील, असे उपक्रम हाती घ्यावेत. ८) भारतातील सर्व अभिजात भाषांमधील, भाषिक आणि साहित्यिक कृतींची चर्चा करणे, त्या समजून घेणे, त्यांचे भाषांतर करणे असे उपक्रम वाढीस लावावे. .Premium|Telangana Security Transformation: तेलंगणाने आपली शहरे महिला आणि व्यवसायांसाठी सुरक्षित कशी बनवली?.९) सर्व अभिजात भाषांनी आपला इतिहास, संस्कृती यांच्याआधारे, परस्परसंवाद वाढवून आपला समान सांस्कृतिक धागा बळकट करावा.१०) महाविद्यालये आणि विद्यापीठे यांतून अभिजात मराठीचे उत्तम अभ्यासक तयार व्हावेत, यासाठी अध्यापनात आणि अभ्यासक्रमात आवश्यक ते बदल घडवावेत.११) आज विद्यार्थ्यांना मराठी शिकवताना केवळ साहित्य म्हणून शिकवू नये, तर त्यांच्याकडून भाषेचा अभ्यास आग्रहाने करवून घ्यावा. त्यासाठी अभ्यासक्रमात भाषेच्या अभ्यासाला ४०टक्के स्थान द्यावे आणि उर्वरित ६०% भागात साहित्य शिकवावे. १२) मराठीचे भाषारूप आणि व्याकरण कसकसे बदलत गेले, याचा अभ्यास करताना प्राचीन रूप आणि आजची मराठी यांचा तौलनिक अभ्यास करावा..Premium I BSE Index:बीएसई कॅपिटल मार्केट्स अँड इन्शुरन्स इंडेक्स.१३) मराठी भाषा, भाषाविज्ञान, संस्कृतिअभ्यास, इतिहास आणि पुरातत्त्वविद्या अशा विविध विषयांचा एकत्रित अभ्यास करणारे विद्यार्थी असतील तर त्यांना अभिजात भाषाविषयक विविध प्रकल्पांमध्ये चांगल्या पद्धतीने सहभाग नोंदवता येईल.आपली भाषा अभिजात पदवीस पोहोचली आहे. आता ती प्रगत आणि आधुनिक बनवण्यासाठी सक्रिय होणे, हे आपले कर्तव्य आहे. हे उद्दिष्ट गाठताना भाषेच्या अभिजात रूपाकडे दुर्लक्ष न करता, तिच्या इतिहासाच्या आधारे, आपल्या वर्तमानाचे निरीक्षण करावे आणि दमदार भविष्याकडे पावले टाकावीत. तसे सीमोल्लंघन करण्याची वेळ समीप आलेली आहे. आजच्या मराठी भाषागौरव दिनानिमित्त सर्व मराठीजनांनी तसा संकल्प करावा. (लेखक फर्ग्युसन महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक आहेत.).सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.