

Struggle of Marathi Actors
esakal
डॉ. मिलिंद शिंदे - saptrang@esakal.com
जेव्हा कलाकार म्हणून एखादा कलावंत मुंबईत पाऊल टाकतो, पैसे नसतातच हे गृहीत आहे. सुरुवात कुठून करायची हाही मोठा प्रश्न समोर उभा राहतो. मग आपसूकच दादरच्या शिवाजी मंदिराकडे तुमचे पाय वळतात. पण शिवाजी मंदिरच्या रंगमंचावर जायला... त्यावर उभे राहून आपली कला सादर करायला... स्वतःचं नाटक यायला किती कालावधी लागेल याची काहीच शाश्वती नाही. तुम्ही तसे लोकांना माहीत नसता. त्यामुळे तुम्ही कुणाच्या हिशेबात नसता. तुमचा काउंट नसेल, तर तुम्ही सर्व अर्थाने निरुपयोगी...
‘‘तुम्ही घ्या पुरस्कार, बाहुल्या, आम्ही नाचतोय त्या ॲवार्ड फंक्शनमध्ये.’’ सिद्धार्थ जाधव अगदीच नवा होता... पण आश्वासक होता. तेव्हा एका चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मला पुरस्कार (बाहुली) मिळाला. तो कार्यक्रम संपल्यावर सिद्धार्थ मला हे वाक्य म्हणाला. अर्थात नंतर त्याने अनेक पुरस्कार मिळवले. वस्तुतः त्याच्या मनात असलेलं हे शल्य त्यानं त्याला यशाचा - पुरस्काराचा पाठलाग करण्यासाठी तयार केलं असावं...
ही मोठी कसरत आहे. जेव्हा कलाकार म्हणून एखादा कलावंत (व्यक्ती) मुंबईत पाऊल टाकतो, पैसे नसतातच हे गृहीत आहे. सुरुवात कुठून करायची हाही मोठा प्रश्न समोर उभा राहतो. मग आपसूकच दादरच्या शिवाजी मंदिराकडे तुमचे पाय वळतात. पण शिवाजी मंदिरच्या रंगमंचावर जायला... त्यावर उभे राहून आपली कला सादर करायला... स्वतःचं नाटक यायला किती कालावधी लागेल याची काहीच शाश्वती नाही. तुम्ही तसे लोकांना माहीत नसता. त्यामुळे तुम्ही कुणाच्या हिशेबात नसता. तुमचा काउंट नसेल, तर तुम्ही सर्व अर्थाने निरुपयोगी...