Premium|Study Room : मराठवाड्याच्या हवामानात मोठा बदल; शेती आणि पाणी व्यवस्थापनासमोर नवी आव्हाने

Marathwada Climate Change and Drought : मराठवाड्यातील वाढते तापमान, पावसाच्या बदलत्या पद्धती आणि भूजलाचा वाढता वापर यामुळे शेती व पाणी व्यवस्थापनासमोर नवी आव्हाने निर्माण होत आहेत.
Marathwada Climate Change and Drought

Marathwada Climate Change and Drought

esakal

Updated on: 

मराठवाड्यात दुष्काळ आणि पाणीटंचाईचा प्रश्न अनेक वर्षांपासून आहे. मात्र आता या भागाच्या हवामानातही दीर्घकाळात बदल होत असल्याचे संशोधनातून दिसून येत आहे. वाढते तापमान, पावसाची बदलती पद्धत आणि भूजलाचा वाढता वापर यामुळे शेती आणि पाणी व्यवस्थापनासमोर नवी आव्हाने निर्माण होत आहेत. हवामान विभागाच्या अभ्यासातून कोणते बदल समोर आले आहेत? २०२६ मधील दुष्काळाचा हवामानातील या बदलांशी काय संबंध आहे? वेगवेगळ्या तालुक्यांसाठी स्वतंत्र नियोजन का गरजेचे आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आणि मराठवाड्यापुढील आव्हाने समजून घेण्यासाठी हा सखोल लेख नक्की वाचा.

हवामानात बदल होण्याचे संकेत

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमधील शेती मोठ्या प्रमाणात पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे किती पाऊस पडतो, तो कधी आणि किती दिवस पडतो, तसेच दोन पावसांमध्ये किती दिवसांचे अंतर असते, याचा थेट परिणाम शेतीवर होतो. मराठवाड्याने १९७२ आणि २०१५ मध्ये मोठ्या दुष्काळाचा सामना केला आहे. दुष्काळ ही या भागाची जुनी समस्या असली, तरी आता वाढते तापमान आणि हवामानात होत असलेल्या दीर्घकालीन बदलांकडेही लक्ष देणे गरजेचे झाले आहे.

१ ऑक्टोबर २०२६ रोजी भारतीय हवामान विभागाच्या MAUSAM या संशोधनपत्रिकेत एक अभ्यास प्रसिद्ध झाला. Identifying the climate zones shifts of Indian meteorological subdivisions: insights from historical records असे या अभ्यासाचे नाव आहे. या अभ्यासासाठी १९५१ ते २०२० या काळातील पावसाच्या नोंदी आणि दिवसाचे व रात्रीचे कमाल-किमान तापमान यांचा अभ्यास करण्यात आला.

या संशोधनातील नकाशांच्या आधारे मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील बहुतांश भागांच्या हवामानात बदल झाल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले आहे. १९६१ ते १९९० या काळात हा भाग उष्णकटिबंधीय सवाना हवामान विभागात होता. मात्र १९९१ ते २०२० या काळात तो उष्ण अर्ध-शुष्क हवामान विभागाकडे सरकला. या बदलामागे दिवसाचे आणि रात्रीचे तापमान वाढणे हा महत्त्वाचा घटक असल्याचे संशोधकांनी सांगितले आहे.

मात्र याचा अर्थ मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्याचे किंवा तालुक्याचे हवामान सारखेच बदलले आहे, असा नाही. हा निष्कर्ष अनेक वर्षांच्या हवामान नोंदींच्या अभ्यासातून काढण्यात आला आहे. एखाद्या वर्षी कमी पाऊस पडला किंवा एका हंगामात दुष्काळ पडला, म्हणून हवामान बदलले असे म्हणता येत नाही. तसेच हवामान विभाग बदलला म्हणजे मराठवाडा वाळवंट बनत आहे, असाही त्याचा अर्थ होत नाही.

Loading content, please wait...