Premium|AI marine safety tech : सागरी जीवांच्या रक्षणासाठी 'एआय' सरसावले; अमेरिकेतील 'व्हेलस्पॉटर' तंत्रज्ञान रोखणार जहाजांची धडक!

Marine Wildlife Protection Ships Collision Prevention 2026 : सॅन फ्रान्सिस्को उपसागरात विस्थापित ग्रे व्हेल माशांना जहाजांच्या धडकेपासून वाचवणाऱ्या 'व्हेलस्पॉटर' या अत्याधुनिक एआय थर्मल कॅमेरा प्रणालीचे महत्त्व आणि भारताच्या सागरी वन्यजीव संवर्धनासाठीचे त्याचे धडे मांडणारा लेख.
AI marine safety tech

AI marine safety tech

esakal

Updated on

ब्रिजेश सिंह - brijeshbsingh@gmail.com

लस्पॉटर’ (WhaleSpotter) नावाचा थर्मल कॅमेरा आणि मशीन लर्निंग प्रणाली हवामान बदलामुळे विस्थापित झालेल्या ग्रे व्हेल माशांना जहाजांच्या धडकेपासून वाचवत आहे. भारताच्या सागरी संवर्धनासमोरील आव्हानांसाठीदेखील यात महत्त्वाचे धडे दडले आहेत.

मे महिन्याची एक धुक्याची पहाट. सॅन फ्रान्सिस्को उपसागराच्या अगदी मध्यभागी असलेल्या ‘अँजेल आयलंड’वरील रेडिओ टॉवरवर बसवलेल्या थर्मल कॅमेऱ्याने अचानक एक वेगळी गोष्ट टिपली. सभोवतालच्या पाण्याच्या तापमानापेक्षा सुमारे दोन अंश सेल्सिअस जास्त तापमान असलेला गरम हवेचा एक लोट पाण्याच्या पृष्ठभागावरून वर येताना दिसला. लाखो जुन्या चित्रांवर आधीच प्रशिक्षित असलेल्या एका कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रणालीने अवघ्या काही सेकंदांतच ओळखले, की हा दुसरा-तिसरा काही नसून एका महाकाय ‘ग्रे व्हेल’ माशाच्या श्वासोच्छवासाचा फवारा आहे! तातडीने हा इशारा जवळून जाणाऱ्या एका महाकाय मालवाहू जहाजाला पाठवण्यात आला. जहाजाचा वेग मंदावला आणि एका मोठ्या अपघाताचा धोका टळला.

हे कोणतेही कल्पित विज्ञान कादंबरीतील दृश्य नाही; तर ही आजची सत्य परिस्थिती आहे. समुद्र वैज्ञानिक, युनायटेड स्टेट्स कोस्ट गार्ड आणि स्थानिक फेरी बोट चालकांच्या एका संयुक्त गटाने १९ मे रोजी ‘व्हेलस्पॉटर’ ही एआय-आधारित प्रणाली जगासमोर आणली. रिअल-टाइम वन्यजीव संवर्धनासाठी मशीन लर्निंगचा वापर करण्याचा हा आजवरचा अत्यंत प्रगत आणि कौतुकास्पद प्रयत्न आहे. सध्याच्या गंभीर परिस्थितीत हे पाऊल अगदी योग्य वेळी उचलले गेले आहे.

सॅन फ्रान्सिस्को उपसागरातून प्रवास करणारे हे ग्रे व्हेल मासे पृथ्वीवरील सर्वात आश्चर्यकारक स्थलांतर करणाऱ्या जीवांपैकी एक मानले जातात. दरवर्षी ते अलास्काच्या थंड अन्नक्षेत्रापासून मेक्सिकोमधील ‘बाजा कॅलिफोर्निया’च्या प्रजननासाठी अनुकूल असलेल्या खाडीपर्यंत तब्बल १६ हजार किलोमीटरचा मोठा प्रवास करतात; परंतु सध्याच्या जागतिक हवामान बदलाने या प्राचीन प्रवासाचे सगळे नियमच बदलून टाकले आहेत. आर्क्टिकमधील वाढत्या तापमानामुळे तिथला बर्फ वितळत असून, तिथे वाढणाऱ्या शेवाळाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. हेच शेवाळ तिथल्या लहान खेकड्यांचे (अ‍ॅम्फिपॉड्स) मुख्य अन्न असते, ज्यांवर हे व्हेल मासे जगतात. अन्नसाखळी विस्कळित झाल्यामुळे या माशांची संख्या झपाट्याने घटत आहे. २०१८ मधील सुमारे २०,५०० वरून २०२३ मध्ये ही संख्या साधारण १४,५०० पर्यंत खाली आली आहे. म्हणजेच अवघ्या पाच वर्षांत त्यांची संख्या तब्बल ३० टक्क्यांनी घसरली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com