
भारताचा प्रवास महाशक्ती होण्याकडे होत आहे. या प्रवासामध्ये देशाची राज्यव्यवस्था हा सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. लोकचळवळीतून उदयाला आलेल्या आम आदमी पक्षाचा (आप) दोन महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. अरविंद केजरीवाल यांचा अहंमन्य स्वभाव या पराभवामागे होता, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, दिल्लीतील स्वप्न भंगले असले, तरीही लोकचळवळ ही काळाची गरज आहे. जनतेचे प्रश्न हाताळणारे राजकीय पक्ष आवश्यक आहेत, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि आम आदमी पक्षाचे संस्थापक सदस्य मयंक गांधी यांनी व्यक्त केले. देशाची सध्याची राजकीय परिस्थिती आणि आम आदमी पक्षाच्या भवितव्याविषयी ‘सरकारनामा’च्या प्रतिनिधी मृणालिनी नानिवडेकर यांनी त्यांच्याशी केलेली बातचीत...