Premium|Mumbai Mayor Ritu Tawde : मुंबईचा चेहरामोहरा बदलणार! नवनिर्वाचित महापौर रितू तावडे यांचा 'मास्टर प्लॅन' काय?

Mumbai Infrastructure Projects : मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर रितू तावडे यांनी शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा निर्धार व्यक्त केला असून, एआय तंत्रज्ञानाचा वापर, बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध मोहीम, फिनटेक सिटी आणि खड्डेमुक्त रस्ते यांसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांद्वारे मुंबईला सुरक्षित आणि प्रगत बनवण्याचा अजेंडा मांडला आहे.
Mumbai Mayor Ritu Tawde development agenda and civic reforms

Mumbai Mayor Ritu Tawde development agenda and civic reforms

esakal

Updated on

आपली मुंबई सुरक्षित आणि निरोगी असायला हवी. त्याचबरोबर शहराच्या विकासाला गती देऊ. त्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून काम करू आणि मुंबईचा चेहरामोहरा बदलू. हाच आपला अजेंडा असल्याचे ठाम प्रतिपादन मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर रितू तावडे यांनी सरकारनामाचे प्रतिनिधी विष्णू सोनवणे यांना दिलेल्या मुलाखतीत केले.

आपण मुंबईच्या सुरक्षेला प्राधान्य दिले आहे. बांगलादेशींविरूद्धच्या मोहिमेला वेग दिला आहे. त्यासाठी ‘एआय’चा वापरही करणार आहात. त्याविषयी काय सांगाल?

बेकायदा बांगलादेशींना हटविणे हे आमचे उद्दिष्ट आहे. शहर सुरक्षित राहिले पाहिजे, ही आमची जबाबदारी आहे. सार्वजनिक ठिकाणी सुरक्षेला प्राधान्य दिले जाईल. २३७ अवैध जन्म प्रमाणपत्रांचे वाटप झाले आहे. ही गंभीर बाब आहे. बोगस जन्म प्रमाणपत्र वाटप हे पालिकेच्या आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संगनमताने झाले आहे. या प्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यांविरूद्ध गुन्हे दाखल केले जातील. शहरात बांगलादेशींसह फेरीवाल्यांची सरसकट झाडाझडती होणार असून मुंबईकरांना चालायला मोकळे पदपाथ द्यायचे आहेत, बोगस कागदपत्रे तयार करून मुंबईत झोपडपट्टीत बांगलादेशी राहत आहेत. पदपथावर अतिक्रमण करून ते फेरीवाला व्यवसाय करीत आहेत. महापालिका, पोलिस यांच्यामार्फत त्यांचा शोध घेऊन, त्यांची कागदपत्रे तपासून त्यांना मुंबईतून हटविण्यात येईल. त्यासाठी ‘एआय’चा वापरही करून सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा वाढविण्यासाठी प्राधान्य दिले जाईल. मुंबई सुरक्षित राहिली पाहिजे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com