

MCA election
esakal
निवडणूक म्हणजे राजकारण आलेच आणि राजकारण आले म्हणजेच कोणत्याही टप्प्यावर उलटसुलट घटना घडायची, टोकाच्या तडजोडी होण्याची शक्यताही वाढते. विरोध दर्शवताना पुढे सरसावलेले लोक महाराष्ट्र क्रिकेटची काळजी म्हणून उभे आहेत का राजकारणी म्हणून, हे लवकरच कळणार आहे.
प्रस्ताव इतका घटनाबाह्य होता, की रोहित पवारांचे विरोधक एकजूट व्हायला वेळ लागला नाही. भारतीय संघाचे माजी खेळाडू केदार जाधव यांनी झाल्या प्रकाराविरुद्ध विरोधाचे बिगुल वाजवले, ज्याला असे समजते की अजय शिर्केंनीही पाठिंबा दिला आहे. त्यातून केदार जाधव भारतीय जनता पक्षाचा अधिकृत सदस्य झालेले असल्याने ते राजकीय वजनही केदार यांच्या मागे उभे राहिले आहे. सगळ्यांनी मिळून न्यायालय गाठून फिर्याद नोंदवली. कारण रोहित पवारांनी एमसीएची निवडणूक ६ जानेवारीला होण्याची फिल्डींग लवून ठेवली होती. साधारणपणे न्यायालय घोषित केलेल्या निवडणुकीला रोखत नाही. या वेळची गोष्ट इतकी मोठी होती की न्यायालयाने निवडणूक रोखण्याचे आदेश देताना पुढील सुनावणी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करण्याचा निर्णय जाहीर केला. एका नो बॉलने महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या राजकारणाचे चित्र बदलले आहे. हाती असलेल्या सत्तेची पकड रोहित पवारांच्या एका कृतीने अचानक ढिली पडली आहे. मी कोणत्याही गोष्टी गृहीत धरत नाहीये कारण निवडणूक म्हणजे राजकारण आलेच आणि राजकारण आले म्हणजेच कोणत्याही टप्प्यावर उलटसुलट घटना घडायची टोकाच्या तडजोडी होण्याची शक्यताही वाढते. विरोध दर्शवताना पुढे सरसावलेले लोक महाराष्ट्र क्रिकेटची काळजी म्हणून उभे आहेत की राजकारणी म्हणून हे लवकरच कळणार आहे.