
हर्षवर्धन पुरंदरे
mumbaikar100@mail.com
मराठी भाषेत अर्थविषयक साहित्याची आणि गंभीर चर्चांची वानवाच आहे. मात्र संजीव चांदोरकर यांच्या ‘मायक्रो फायनान्स : गरिबांसाठी ‘तारक’ की ‘मारक’ ’ आणि ‘मायक्रो फायनान्स : राजकीय अर्थकारण’ या पुस्तकांच्या निमित्ताने तिला छेद जाईल, अशी आशा आहे.
यक्रो फायनान्स : गरिबांसाठी ‘तारक’ की ‘मारक’ आणि ‘मायक्रो फायनान्स : राजकीय अर्थकारण’ या संजीव चांदोरकर यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन लोकवाङ्मय गृहातर्फे नुकतेच झाले. भारतातील झपाट्याने विस्तारणाऱ्या मायक्रो फायनान्स क्षेत्राचा सामाजिक, आर्थिक आणि राजकीय अन्वयार्थ जागतिक संदर्भांसह उलगडत ही पुस्तके व्यवस्थाकेंद्री विचारसरणीने प्रेरित ‘राजकीय वित्तसाक्षरते’चा व्यापक कार्यक्रम मांडतात.