Artificial intelligence uses in world
esakal
पुणे - Artificial Intelligence चा वापर सर्वच देशांमध्ये सुरू झाला आहे. रोज उठून जेव्हा नोकऱ्या जाण्याची बातम्या वर्तमानपत्रातून समोर येतात त्यावेळी जगभरात हीच स्थिती आहे की भारतातच..? बाकीचे देश एआय आणि त्याच्या फायद्या तोट्याशी कसे डील करतायेत, कोणत्या देशात अधिक एआय वापरले जाते, तेथील अर्थव्यवस्थेवर याचा काही परिणाम झाला आहे का, भारत या सगळ्यांत कुठे आहे? त्यासोबतय एआय वापराविषयी ज्या देशात एआय अधिक वापरले जाते त्या देशातील नोकऱ्यांची स्थिती काय आहे असे अनेक प्रश्न तुमच्या आमच्यासारख्या सामान्यांना रोज पडतात. पण याची केवळ ऐकीव आणि अतार्किक उत्तरे मात्र रोज समाजमाध्यमातून मिळत राहतात. भारतीयांच्या मनात एआय हा गरजेपेक्षा भितीचा विषय अधिक झाला आहे.
या सर्व प्रश्नांची शास्त्रशुद्ध पद्धतीने आकडेवारी समोर ठेवत उत्तरे देणारा अहवाल जागतिक स्तरावरील आघाडीच्या मायक्रोसॉफ्ट कंपनीने नुकताच जाहीर केला आहे. मायक्रोसॉफ्टने 'एआय डिफ्यूजन रिपोर्ट २०२५' जाहीर केला आहे. काय म्हंटलं आहे या रिपोर्टमध्ये हे सोप्या भाषेत ‘सकाळ+’ या लेखाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.