From New York to Mumbai: The Politics of Migrant Inclusion in Cities
डॉ. कुलदीपसिंह राजपूत, स्थलांतर, कामगार प्रश्नाचे अभ्यासक
रा ज्यात आगामी महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजले असून, शहरी राजकारण पुन्हा एकदा स्थानिक, भाषिक अस्मिता, स्थलांतर व प्रतिनिधित्व या मुद्द्यांभोवती फिरताना दिसत आहे. मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते कृपाशंकर सिंह हे एका सार्वजनिक कार्यक्रमात म्हणाले की, आम्ही इतक्या मोठ्या संख्येने नगरसेवक निवडून आणू की, त्यातून उत्तर भारतीय समाजाचा महापौर बसवणे शक्य होईल. या विधानाचे अर्थातच राज्यभर पडसाद उमटले असून पुन्हा एकदा राजकारणतातील ''स्थानिक विरुद्ध परप्रांतीय-स्थलांतरित'' हा मुद्दा मुंबई निवडणुकांमध्येही आला आहे. महानगरपालिका निवडणुकांमध्ये स्थलांतरित समाजाचे संख्याबळ, त्यांचे राजकीय संघटन आणि त्यावर आधारित दावे हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.