

Military AI Spending Trends 2024-2030
esakal
अच्युत गोडबोले, रोहित पांढारकर- saptrang@esakal.com
एका आकडेवारीनुसार २०२४ पर्यंत जगभरातला लष्करी एआयवरचा खर्च सुमारे १५ ते २० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचला आहे आणि २०३० पर्यंत तो ५० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त होण्याचा अंदाज आहे. अमेरिका, चीन, रशिया, इस्राईल आणि युरोपियन देश यात आघाडीवर आहेत.
भविष्यात एआयचं चित्र आणखी गंभीर आणि गुंतागुंतीचं असू शकतं. ‘स्वॉर्म ड्रोन्स’ म्हणजे हजारो छोटे ड्रोन्स एकत्र काम करून हल्ला करू शकतील. हे थांबवणं खूप अवघड असेल.
‘एआय’ म्हणजे फक्त एक चॅटबॉट किंवा फोटो बनवणारी टेक्नॉलॉजी नाही; ती आजच्या जगात युद्ध, हेरगिरी आणि राष्ट्रीय सुरक्षा यांचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग बनली आहे. गेल्या काही दशकांत एआयचा वापर हळूहळू वाढत गेला आणि आता तो शस्त्रनिर्मितीपासून प्रत्यक्ष रणांगणापर्यंत पोहोचला आहे. हे समजून घ्यायचं असेल, तर आपण त्याचा इतिहास, वर्तमान आणि भविष्य या तीन टप्प्यांमध्ये पाहिलं तर अधिक स्पष्ट चित्र दिसतं.