

AI emotional dependency
esakal
आज लाखो अमेरिकन एका नव्या सोबत्याचा आधार घेत आहेत. तो कोणी माणूस नाही तर एक मोबाईल ॲप आहे. आपण एआयचा वापर फक्त कामे जलद करण्यासाठी नाही; तर आपला एकटेपणा विसरण्यासाठी करीत आहोत. भविष्यात एआय अजून प्रगत होईल; पण एकमेकांशी जोडले जाण्याची आपली मानवी गरज ती मशीन पूर्ण करू शकणार नाही.
ती उलटून गेलेली असते, घरात एक भयाण शांतता पसरलेली असते आणि मोबाईलवर मित्रांचे मेसेज येणेही कधीच थांबलेले असते. अशा वेळी आज लाखो अमेरिकन एका नव्या सोबत्याचा आधार घेत आहेत. हा सोबती कधी झोपत नाही, तुम्हाला कधीच बोल लावत नाही आणि विशेष म्हणजे तो नेहमी अगदी न चुकता तुमच्या प्रत्येक शब्दाशी सहमत असतो.