
नवप्रवर्तनातून वाढणारी उत्पादकता व त्यातून नफा मिळविण्याऐवजी, उत्पादनसाधनांच्या मालकीहक्कातून व अल्पजनसत्तेच्या सरकारवरील नियंत्रणातून अधिकाधिक मोबदला व संपत्ती मिळविण्यावर सध्याच्या भांडवलशाहीचा जोर दिसतो. म्हणजे ही भांडवलशाही व्यवस्था पूर्वीसारखी ‘गतिशील’ राहिलेली नाही. असे का ?
एकूणच भांडवलशाही व्यवस्थेची कार्यपद्धती आणि सकल स्थिर भांडवल संचय ह्या दोघांचा काही परस्पर संबंध आहे का ? म्हणजे विशिष्ट प्रकारच्या भांडवलशाही व्यवस्थेतून गुंतवणूकदरावर व पर्यायाने आर्थिक वाढीवर परिणाम झालाय व होतो आहे, असे काही आहे काय?२००८ नंतरच्या वित्तीय संकटानंतर भांडवलशाहीचे स्वरूप बदलत चालले आहे. म्हणजे नेमके काय होत चाललेय? नवप्रवर्तनातून (इनोव्हेशन) वाढणारी उत्पादकता व त्यातून नफा (पैशारुपी) मिळविण्याऐवजी, उत्पादन साधनांच्या मालकीहक्कातून व अल्पजनसत्तेच्या सरकारवरील नियंत्रणातून अधिकाधिक मोबदला व संपत्ती मिळविण्यावर आजच्या भांडवलशाहीचा जोर आहे. म्हणजे ही भांडवलशाही व्यवस्था पूर्वीसारखी ''गतिशील'' राहिलेली नाही. असे का ? तर एकूणच जागतिक अर्थव्यवस्थांमधील (विशेषतः विकसित) काही देशांमध्ये ''स्थिर गुंतवणूक '' ठप्प झालीय. काही ठिकाणी ती घसरत चाललीय.