

Gen Z Unemployment and Psychological Crisis India
esakal
श्याम पेठकर- pethkar.shyamrao@gmail.com
व्यवस्थेतील अनास्थेच्या कोंडीत अडकलेला आजचा बेरोजगार जेन-झी तरुण ‘झुरळ’ ठरू लागला आहे. माणूस खरोखर उत्क्रांत होतो आहे की हळूहळू ‘झुरळमानव’ बनतो आहे? प्रश्न विचारणे धोकादायक ठरत चाललेल्या काळात ‘झुरळ’ हेच नव्या पिढीचे रूपक बनत आहे. ‘हो, मी आहे झुरळ!’ असे म्हणण्यामागील व्यंगात्मक मुद्दा बाजूला राहू दे; पण त्याआधी त्यामागची अस्वस्थता, संताप आणि विद्रोह समजून घ्यायला हवा.
आमच्या बंडोपंतांचे घर... आजच्या भाषेत त्याला वन बीएचके वगैरे म्हणायचे. लिफ्ट नसलेल्या सहनिवासातील ते घर... अगदी खिडकी आणि दारांचे पडदेही वहिनींच्या त्यातल्या त्या बऱ्या; पण जुन्या साड्यांनी त्यांनीच तयार केलेले. त्यातल्या त्यात त्यांचा हा फ्लॅट प्रशस्त नाही; पण आढे भरपूर असलेला. म्हणजे अडगळीचे सामान ठेवायला खूप जागा. वहिनींनी कुठलेही आढेवेढे न घेता सगळी अडगळ या आढ्यांवर ठेवलेली. संडास-बाथरूमच्या वर असेच प्रशस्त (!) आढे, त्यावर वरच्या फ्लॅटमधून पाणी टपकत असते अधूनमधून... आता हे अधूनमधून यासाठी, की त्यांच्या अडीच हजार स्क्वेअर फुटाच्या जमिनीवरील सहा फ्लॅटच्या या स्कीममध्ये कधीमधीच पाणी असते दिवसातून... जेव्हा पाणी असते तेव्हाच वापरले जाते. नेमक्या यांच्या बाथरूमच्या वर, वरच्यांचे बाथरूम असल्याने कितीही सांभाळून वापरले तरीही पाणी वापरले, की ते खाली टपकतेच. त्यामुळे तिथे आर्द्रता असते. ओलसर वास असतो...