
सुनील चावके
पहलगामच्या नृशंस घटनेमुळे देशातील वातावरण तापले आहे. सारी चर्चा पाकिस्तानविरुद्धच्या युद्धावर केंद्रित झाली असताना, कुणाच्या ध्यानीमनीही नसताना मोदी सरकारने जातिनिहाय जनगणनेची घोषणा केली. त्यामागचे हेतू नेमके काय आहेत?
निरपराध पर्यटकांची हत्या करणाऱ्या पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेवर प्रामुख्याने याच विषयावर केंद्रित झालेली चर्चा जातीय जनगणनेच्या घोषणेमुळे काही काळ अन्यत्र वळली असेल. परंतु पहलगामच्या घटनेचा जनमानसावर इतका खोलवर आघात झाला आहे की, भारताकडून प्रत्युत्तरात ठोस, दृश्य, कायमची अद्दल घडविणारी लष्करी कारवाई झाल्याशिवाय त्याची चर्चा संपण्याची शक्यता नाही.