
सुनील चावके
संसदेच्या सोमवारपासून सुरू होत असलेल्या अधिवेशनात सरकारची कसोटी लागेल. विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर सरकारला घेरण्याची विरोधकांना संधी आहे. पण ती संधी ते कशी घेतात, यावर बरेच काही अवलंबून असेल. मोदी सरकारची व्यूहरचना ‘आक्रमण हाच बचाव’ अशी असेल.
सं सदेच्या सोमवारपासून सुरू होत असलेल्या पावसाळी अधिवेशनात अनेक ज्वलंत मुद्यांवरुन अडचणीत आलेल्या केंद्रातील मोदी सरकारला सतत बचावात्मक पवित्रा घ्यावा लागेल, असे चित्र आहे. गेल्या ११ वर्षांत सरकारवर प्रथमच चहूबाजूंनी घेरले जाण्याची स्थिती ओढवली आहे.