
अरविंद जगताप
jarvindas30@gmail.com
मोल्सवर्थ नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याला मराठी भाषेविषयी प्रेम वाटलं. त्याने मराठी पंडितांच्या मदतीने शब्द गोळा केले आणि मराठीतला असा शब्दकोश बनवला जो आजही वापरात आहे. किती दूरदृष्टी होती त्याची... मराठी भाषेत असं परकीय लोकांचंही योगदान आहे.
मराठी भाषा दिवस आला की मराठी प्रेमाची लाट येते. त्यात आता मराठी अभिजात झाली. म्हणजे नेमकं काय झालं हे खूप लोकांना कळलं नाही. काही कारणच नव्हतं. हा एक शासकीय निर्णय असतो. ज्याचा उपयोग करून घेता आला पाहिजे.