एककाळ कसोटी क्रिकेट हेच तरुण क्रिकेटपटूंचं ध्येय असायचं पण आता ते झपाट्याने बदलतंय. आयपीएलमध्ये खेळणारा १४ वर्षांचा वैभव सूर्यवंशी नाहीतर मग वेस्ट इंडिजचा निकोलस पूरन असेल, त्यांनी आयपीएलसारख्या फ्रँचायझी लीगनाच झुकतं माप दिलंय. अगदी आपला धोनी, रोहीत आणि विराटसुद्धा कसोटीतून निवृत्त झालेत पण आयपीएलचं बोट त्यांना सोडवत नाही. कारण त्यात तुफान पैसा आहे.
पण फक्त पैसे हेच काही फ्रँचायझी लीगच्या यशाचं रहस्य नाही...
आयसीसीची धोरणं, खेळाचं बदलतं रुप, प्रेक्षकांची आवड यातल्या प्रत्येक घटकाचा यावर परिणाम होतोय.
समजून घेऊया, 'सकाळ प्लस' च्या या विशेष लेखातून.