
Rural Library Shortage: महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात तब्बल ७५ टक्के मुलांना सार्वजनिक वाचनालयांची सोय नाही. गेल्या ३ वर्षांत जवळपास हजारावर वाचनालयं बंद पडली आहेत. माहितीच्या अधिकारांतर्गत ही माहिती उघड झालीय. हा डेटा आणखी काय सांगतोय ते सविस्तर वाचा.
माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी वाचनालय संचलनालयाकडे (Directorate of Libraries)महाराष्ट्रातील सार्वजनिक वाचनालयांची माहिती मागवली होती. त्यावेळी संचलनालयाने दिलेली माहिती धक्कादायक आहे.