
Marathwada flood damage
esakal
धाराशिव जिल्ह्याच्या परंडा तालुक्यातील वडनेर या गावात २४ सप्टेंबरच्या रात्री महापुरात अडकलेल्या चार जणांना वाचविण्यासाठी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर रात्री एक-दीडच्या सुमारास धावले. त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून एनडीआरटीसच्या सहकार्याने हे काम केले.
अंधाऱ्या रात्री गळ्यापर्यंत आलेल्या पाण्यात स्वतः एक राजकीय नेता उतरतो व तो लोकांना वाचवतो, ही व्हिडिओ सोशल मिडियावर आला आणि सकाळी सरकारचे अनेक मंत्री, खुद्द मुख्यमंत्रीही अतिवृष्टीग्रस्त भागाकडे धावले. त्यांना ते म्हणाले की ते माझे कर्तव्य होते ते मी पार पाडले. एका कृतीने अवघ्या महाराष्ट्राचे मन जिंकलेल्या ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांची मुलाखत घेतली आहे, साप्ताहिक सरकारनामाचे प्रतिनिधी सचिन वाघमारे यांनी..