Want to Trademark Your Name or Logo? Here's the Complete Process
महेंद्रसिंग धोनी... आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एक मोठं नाव. ज्याला संपूर्ण क्रिकेटविश्व कॅप्टन कूल म्हणून ओळखतं.. आता त्याची ही ओळख जागतिक ब्रँड म्हणून समोर आली आले, कारण धोनीने 'Captain Cool' या नावासाठी ट्रेडमार्क अर्ज दाखल केला आहे आणि त्याला मान्यताही मिळाली आहे. त्यामुळे आता कॅप्टन कूल हे नाव कुणा दुसऱ्या व्यक्तीला, ब्रँडला वापरता येणार नाही. आता यावर काही हरकती आल्या आहेत, परंतु त्यावर न्यायालय निर्णय देईल. भारताच्या माजी कर्णधाराला त्याच्या टोपण नावाचा ट्रेडमार्क का घ्यावासा वाटला? त्यामागची त्याची नेमकी योजना काय असावी? मुळात ट्रेडमार्क म्हणजे काय अन् ते मिळवण्याची प्रक्रिया काय? हे सकाळ+ च्या या लेखात जाणून घेऊयात.