Premium|MTV shutdown: चार दशकांहून अधिक काळ संगीत संस्कृतीचं प्रतीक ठरलेली ‘एमटीव्ही’ वाहिनी बंद होणार, ९०च्या दशकातील पिढीला नॉस्टॅल्जिक धक्का !

MTV India 2025: ‘एमटीव्ही’ने संगीत ऐकण्याबरोबरच पाहण्याचीही दृष्टी दिली, पण आज डिजिटल युगात त्याचं अस्तित्व हळूहळू कमी झालं आहे, आज ती वाहिनी बंद होत असली तरी तिचा सांस्कृतिक वारसा मात्र अमर राहिल
MTV shutdown

MTV shutdown

esakal

Updated on

गिरीश वानखेडे

girishwankhede101@gmail.com

चार दशकांहून अधिक काळ युवा संस्कृतीचे प्रतीक असलेली दंतकथासदृश वाहिनी ‘एमटीव्ही’ आपले प्रसारण थांबवणार आहे. जी पिढी एमटीव्हीसोबत वाढली त्यांच्यासाठी ती बंद होणे मनाला चटका लावणारी आणि वैयक्तिक नुकसानीची बाब आहे. हा केवळ एका चॅनेलचा अंत नाही तर आपल्या तारुण्याचा एक भाग हरवण्यासारखे आहे.

९०च्या दशकात उत्साही आणि बंडखोर वातावरणात वाढलेल्या लाखो लोकांच्या हृदयात ३१ डिसेंबर २०२५ रोजी एक मोठा बदल होणार आहे तो म्हणजे, चार दशकांहून अधिक काळ युवा संस्कृतीचे प्रतीक असलेली दंतकथासदृश वाहिनी ‘एमटीव्ही’ आपले प्रसारण थांबवणार आहे. एमटीव्ही म्युझिक, एमटीव्ही ८०, एमटीव्ही ९०, क्लब एमटीव्ही आणि एमटीव्ही लाइव्ह अशा पाच वाहिन्यांचे प्रसारण थांबणार असल्याची घोषणा स्कायडान्स मीडियामध्ये विलीन झालेल्या पॅरामाऊंट ग्लोबलने केली आहे. कंपनीच्या जागतिक खर्चकपात धोरणांतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे.

ज्यांनी एमटीव्हीच्या संगीत व्हिडिओंच्या कॅलिडोस्कोपमधून, निर्भीड व्हीजेंच्या निवेदनातून आणि क्रांतिकारी कार्यक्रमांमधून तारुण्याचे दिवस अनुभवले त्यांच्यासाठी हा केवळ एका वाहिनीचा अंत नाही; तर स्वतःची ओळख, आपल्या आठवणी आणि त्या सुरावटीलाही अखेरचा निरोप आहे ज्यांनी आपल्या पार्ट्यांमध्ये रंगत चढवली अन् संगीताकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कायमचा बदलला. २०२६च्या उंबरठ्यावर उभे असताना, एमटीव्ही मौन होणार हे समजणे म्हणजे दीर्घकाळ साथ देणाऱ्या आपल्या मित्राला गमावण्यासारखे आहे. एक असा मित्र, ज्याने आपल्या तारुण्य संगीतमय बनवले आणि आपल्याला संगीत ऐकण्याबरोबरच पाहायलादेखील शिकवले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com