
आयआयटीमध्ये शिक्षण घेणं हे अनेक मुलांचं स्वप्न असतं. मात्र ते पूर्ण करण्याची संधी सगळ्यांनाच मिळते असं नाही. सगळ्यात आधी तर बारावीनंतर जेईई देऊन मुलांना इंजिनीअरिंगसाठी म्हणजेच बीटेक डिग्रीसाठी प्रवेश घेता येतो. काहीजण त्यावेळी एकात्मिक म्हणजेच इंटिग्रेटेड अभ्यासक्रम निवडतात. ज्यात त्यांना पाच वर्षांचा अभ्यासक्रम करावा लागतो पण एमटेक म्हणजेच पदव्युत्तर पदवी मिळते. यासोबतच ड्युअल डिग्री अभ्यासक्रमही असतातच.