
Mumbai Local Train Accident: मुंबई लोकलमध्ये दररोज सरासरी ६-७ प्रवाशांचा मृत्यू होतो. हे आम्ही नाही तर सरकारी आकडेवारी सांगते आहे. दिवा मुंब्रा स्थानकादरम्यान लोकलमधून ८ प्रवासी खाली पडले या बातमीमुळे सगळं वातावरण ढवळून निघालं आहे. मुंब्रा स्थानकातील या प्रवाशांचा रुळावर पडलेल्या अवस्थेतील व्हिडीओजही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
मात्र हे असे अपघात मुंबईकरांच्या जगण्याचा भागच बनले आहेत का इतपत भयंकर आकडेवारी आहे. सामाजिक कार्यकर्ते समीर झवेरी यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत मिळवलेल्या माहितीनुसार २०२४साली मुंबई लोकल ट्रेनमध्ये २ हजार चारशे एकेचाळीस (२,४४१) प्रवाशांचा मृत्यू झाला. या आकडेवारीविषयी आणि रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेविषयक अधिक जाणून घेऊ, सकाळ प्लसच्या या विशेष लेखामध्ये...