Mumbai Municipal Corporation : राजकीय अर्थकारण हाच महत्त्वाचा दृष्टिकोन

Mumbai BMC political economy analysis : मुंबई महापालिकेचा प्रचंड अर्थसंकल्प, ठेवी, रियल इस्टेट आणि करआधारित उत्पन्न यामुळे राजकारणापेक्षा राजकीय अर्थकारण केंद्रस्थानी आले आहे. मराठी-अमराठी आर्थिक हितसंबंधांवर आधारित राजकीय स्पर्धा बीएमसी निवडणुकांत ठळकपणे दिसून येते, असे प्रकाश पवार यांनी मांडले.
Mumbai Municipal Corporation

Mumbai Municipal Corporation

sakal

Updated on

प्रकाश पवार- राज्यशास्त्र विभागप्रमुख, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

महाराष्ट्रात महापालिकांच्या निवडणुका पार पडल्या आहेत. राजकारणापेक्षाही अर्थकारण हा विषय मुंबईतील राजकारणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा बनला आहे. मुंबई व इतर मोठ्या शहरांच्या महापालिकांच्याही निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. मुंबई हे देशात सर्वांत वेगाने वाढणारे शहर बनले आहे. त्यातच उर्वरित महाराष्ट्रातही नागरीकरणाचा वेग जास्त आहे. हे वाढते नागरीकरण व राजकारणातील अर्थकारण कसे एकमेकांच्या हातात हात घालून बेमालूमपणे जात असते, हे सांगणारे नवे सदर

भारतातील स्थानिक शासन संस्थांच्या इतिहासातील इतरत्र न आढळणारे महत्त्वाचे वैशिष्ट्य बृह्नमुंबई महानगरपालिकेत (बीएमसी) आढळते. ते म्हणजे शहरी भागातील राजकीय अर्थकारण. येथील राजकीय अर्थकारण हा राजकारणाचा मध्यवर्ती कणा आहे. हे वैशिष्ट्य आकडेवारीच्या स्वरूपात देखील स्पष्टपणे दिसते. कारण मुंबई महानगरपालिका देशातील सर्वात जास्त श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखली जाते. बीएमसीचे ७४,४१७.४१ कोटीचा अर्थसंकल्प यावर्षीचे आहे. यावर्षीचे महानगरपालिकेचा अर्थसंकल्प १४ हजार ४७२ कोटी ६६ लाख रुपयांनी वाढला आहे. यावरून देखील या महानगरपालिकेचा राजकीय अर्थकारणातील दबदबा स्पष्टपणे दिसतो. या राजकीय अर्थकारणाची चार वैशिष्ट्ये राजकारण स्पर्धेत रूपांतरित करणारी आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com