
आपल्यापैकी अनेकांना शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंड अशा संकल्पना माहीत असतात; पण गुंतवणूक करताना बऱ्याचदा भीती वाटते. कष्टाचे पैसे यात टाकले आणि शेअर बाजार कोसळला, तर सगळे पैसे पाण्यात जातील असं अनेकांना वाटत असतं. त्यात देशावर युद्धाचे ढग आले, तर ही भीती चक्रवाढ पद्धतीने वाढते. यापेक्षा बँकेत पैसे ठेवलेले काय वाईट? असा अनेकांचा प्रश्न असतो. मात्र, बरेचदा ही भीती अनाठायी असल्याचे आढळून येते. शेअर बाजाराविषयीच्या चुकीच्या माहितीमुळे पैसे गुंतविण्यासाठी अनेक जण चाचरत असतात. तुम्हालाही शेअरमध्ये पैसे गुंतविण्याची इच्छा आहे आणि केवळ पैसे बुडतील या भीतीनं तुम्ही संकोच करत असाल, तर हा लेख नक्कीच मार्गदर्शक ठरेल.