esakal | कंचनजंगा'वर खरंच लोक गायब होतात?

बोलून बातमी शोधा

kanchenjunga}
कंचनजंगा'वर खरंच लोक गायब होतात?
sakal_logo
By
स्नेहल कदम

जग फार मोठं आहे आणि त्याहीपेक्षा जगातील अशी काही ठिकाणं मोठी आहेत की, ज्यांची काही रहस्यं आणि त्याच्यासोबत त्यांच्या आख्यायिका जोडलेल्या आहेत. या प्रत्येक रहस्यासोबत हजारो आख्यायिका जोडलेल्या असतात. परंतु तुम्हाला माहीत आहे का...? की या आख्यायिका पाठीमागे बरेच खरं-खोटं लपलेलं असतं. आपण रहस्यमय ठिकाणांबद्दल बोलत असू तर यामध्ये हिमालयाला मागे ठेवून कसं चालेल! हिमालयासोबत जोडलेल्या अनेक आख्यायिका, दंतकथा तुम्ही ऐकल्या असतील, परंतु आज आपण बघणार आहोत हिमालयाचे एक खास शिखर, ज्याचं नाव कंचनजंगा आहे.

भारताचे सर्वांत उंच शिखर कंचनजंगासोबत अनेक आख्यायिका आहेत, त्या आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. तुम्हाला कदाचित माहीत नसेल की, पृथ्वीवरील सगळ्यांत उंच क्रमांक दोनचे शिखर हे हिमालय आहे आणि भारतातील सर्वांत उंच शिखर आहे. एवढंच नाही तर याच्याबाबत अनेक दंतकथा, आख्यायिका सांगितल्या जातात. याच्याशी संबंधित अनेक वादविवाद पण आहेत. तर आपण या शिखराबद्दल जाणून घेऊया.

कंचनजंगा नाव कसे पडले?

आपण नेहमी कंचनजंगासंबंधी असं म्हणत असतो, की हे एकच नाव आहे. परंतु हे चार शब्दांचे एकत्रिकरण आहे. कांग (बर्फ), चेन (मोठा), डजो (खजिना), अंगा (पाच) हे तिबेटियन शब्द आहेत, ज्यांचा अर्थ "बर्फात दडलेले पाच खजिने' असा होतो. असं म्हटलं जातं की, यातील प्रत्येक खजिना देवाने ठेवलेला आहे. यात सोने, चांदी, जवाहर, पौराणिक पुस्तकं आणि धान्य यांचा समावेश होतो. पाच शिखरांपैकी तीन भारत-नेपाळ सीमास्थित आहेत, उत्तर सिक्कीम आणि नेपाळचे तापेलजंग जिल्ह्याच्या मध्ये वसलेली आहेत. तर दोन शिखरं पूर्णपणे नेपाळमध्ये आहेत.

सन 1800 पर्यंत कंचनजंगाला सगळ्यांत उंच डोंगर समजला जायचा

तुम्हाला माहीत आहेच की, हिमालय शिखरातील सगळ्यांत उंच डोंगर माउंट एव्हरेस्ट आहे. परंतु सन 1800 पर्यंत कंचनजंगाला सगळ्यात उंच समजलं जायचं. प्रत्यक्ष 1852 मध्ये ब्रिटिश टीमने एक ट्रिग्नोमेट्रिक सर्व्हे केला होता, ज्यात माउंट एव्हरेस्टला सगळ्यांत उंच शिखर समजलं होतं. परंतु त्या अगोदर कंचनजंगाला सगळ्यांत उंच समजलं जायचं. जर तुम्ही 200 वर्षांपूर्वी जन्मला असता तर जागतिक तथ्यात थोडा बदल झाला असता.

कंचनजंगाशी संबंधित झाले अनेक वादविवाद

कंचनजंगाशी संबंधित अनेक वादविवाद झाले आहेत. भारत सरकारने कंचनजंगाच्या मोहिमा सन 2000 मध्ये बंद केल्या. परंतु एका आस्ट्रेलियन टीमने 20 हजार डॉलरच्या बदल्यात कंचनजंगावर चढाई केली होती, त्यामुळे स्थानिक लोकांना असं वाटलं, की त्यांच्या देवाचा अनादर करत आहेत. या घटनेमुळे बौद्ध समाजातील लोकांची मने दुखावली गेली होती आणि त्यामुळे त्यांनी कंचनजंगावर चढाई करण्यासाठी नाराजी व्यक्त केली होती. परंतु कोणाला आजही कंचनजंगावर चढाई करायची असेल तर ते नेपाळकडील बाजूने जाऊ शकतात.

या खास कारणांमुळे कंचनजंगा डोंगरावर जात नाहीत लोक

कंचनजंगावर चढाई करणारे ब्राऊन आणि जॉर्ज बॅंड हे पहिले दोन लोक होते, ज्यांनी 25 मे 1955 साली चढाई केली होती. त्या दोघांनी स्थानिक लोकांना शब्द दिला होता की, ते पर्वताच्या वर नाही चढाई करणार. हे यासाठी, की त्या डोंगरावर धार्मिक मान्यतेनुसार देवाचा वास आणि रहिवास आहे. ही मान्यता आजही अस्तित्वात आहे आणि आजपर्यंत कोणीही या पर्वतरांगांच्या वर जाऊ शकलेलं नाही. जवळजवळ 2000 हून अधिक गिर्यारोहकांनी याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला, त्यातील 1/4 लोकांचा या प्रयत्नांत मृत्यू झाला. प्रत्येक गिर्यारोहक या डोंगरापासून काही फूट लांबच पोचतो.

कंचनजंगावर राक्षस आणि भुतं

कंचनजंगावर अगणित लोकांचा मृत्यू ओढवला आहे, त्यातील अनेकांचे पार्थिव आजही परत येऊ शकले नाहीत. कंचनजंगाला एका पौराणिक मान्यतेनुसार एका दैत्याचे घर संबोधले जाते, त्याला स्थानिक भाषेत डजो-अंगा म्हटले जाते. 1925 मध्ये ब्रिटिश टीमने असाच दैत्य बघितल्याचा दावा केला होता, त्याला स्थानिक लोकांनी कंचनजंगा दैत्य संबोधलं होतं. कंचनजंगासंबंधी अनेक भूतांच्या आख्यायिका तयार झाल्या आहेत. प्रत्यक्षात ऑक्‍सिजन कमी असण्याच्या कारणामुळे काही लोकांना भ्रम आणि हैलुसिनेशन्स पण होतो. अशात अनेक लोकांनी भूतं, प्रेतं, आत्मा, दैत्य बघितल्याचा आणि विचित्र आवाज ऐकल्याचा दावा केला आहे.

इथून काही लोकं झाली गायब

कंचनजंगा शिखरावर अनेक लोक गायब झाले आहेत. तुलशुक नामक एक तिबेटियन भिक्‍खू आपल्या 12 सहकाऱ्यांसोबत एका नव्या रस्त्याच्या शोधात या डोंगरावर निघाला होता आणि ते जोरजोरात मंत्र पुटपुटत जात होते. असं म्हटलं जात, की तो बर्फाच्या मध्येच गायब झाला. काही लोक हे पण सांगतात, की तो हिमस्खलनचा शिकार झाला.

असाच 1992 मध्ये एक पोलिश गिर्यारोहक वांडाने कंचनजंगावर जाण्याचा प्रयत्न केला होता. वांडा तिथे चढाई करणारी पहिली महिला बनू इच्छित होती, जिने हिमालयातील सगळ्या 14 डोंगरांवर चढाई केली होती. परंतु ती अचानक गायब झाली. तिचे शरीर कधीच सापडले नाही. असं समजलं जातं, की ती बर्फाच्या खाली दबली गेली आहे.

अशा अनेक आख्यायिका आणि दंतकथा कंचनजंगाशी संबंधित आपणांस मिळतील. हा पर्वत खूप वेगळा तर आहेच पण खासही आहे.