

तुषार पिल्लेवान
नागपूर शहराची वाढती लोकसंख्या आणि शहराचा होत असलेला अस्ताव्यस्त विकास बघता या आराखड्याची नितांत गरज सर्वांनाच जाणवू लागली आहे. मात्र, नागपूर शहराचा विकास आजही २००१ साली तयार करण्यात आलेल्या आराखड्यावरच सुरू आहे.
नागपूरचे विस्तारलेले रूप, अनधिकृत वस्त्या, झोपडपट्ट्यांची वाढती संख्या आणि पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्याची अपुरी व्यवस्था बघता भविष्यात नागपूर ‘तुंबापूर'' होण्याचा धोका आहे.