Premium|Film Production Challenges : सर्कती का नाही तुझी फिल्म पुढं...?

Film Production Challenges and Creative Struggles : ‘सर्कती’ कथेवर चित्रपट बनवण्याचे स्वप्न घेऊन नंदू काळे यांचा संघर्ष सुरू होता. निर्माते, नकार आणि उपहासाचा सामना करत कलाकृती प्रत्यक्षात आणण्याचा त्यांचा प्रयत्न उलगडतो.
Film Production Challenges

Film Production Challenges

esakal

Updated on: 

डॉ. मिलिंद शिंदे - saptrang@esakal.com

सर्कती का नाही तुझी फिल्म पुढं...?

एखादी कथा आवडली की अनेक कलावंत मानधनाचा विचार न करता चित्रपटात कामासाठी पुढे येतात. काही कथांचे बीजही तेवढेच सशक्त असते. निर्मिती पूर्ण होण्यासाठी अनेक दिव्य पार पाडावी लागतात. त्यातून चांगली कलाकृती जन्माला येते.

सर्कती का नाही तुझी फिल्म पुढं...?

नंदू काळेला हा प्रश्न की ही चेष्टा सारखी भेडसावत होती...

कधी सर्कती..?

किती दिवस झाले..?

कधी करणार..?

सदानंद देशमुख (बारोमासकार) यांच्या ‘खुंदळघास’ या कथा संग्रहात ‘सर्कती’ नावाची कथा आहे. त्या कथेवर नंदू काळेला चित्रपट करायचा होता. त्यासाठी तो कथानक-पटकथा घेऊन निर्मात्यांना किंवा जे काही मदत करू शकतात त्यांना भेटत होता.. परंतु मनासारखं काही घडत नव्हतं.. नकार मिळत होते. त्यामुळं हा चित्रपट होईल की नाही या चिंतेत नंदू काळेला ग्रासलं होतं. त्यात लोकांच्या शाब्दीक कोट्या-कसरती.. चेष्टा. एखादा माणूस अतिशय प्रयत्नपूर्वक एखादी कलाकृती घडवून आणू इच्छितो.. त्याला मदत करायचं सोडून लोकांना हा ‘श्‍लेष’ खेळायला फार आवडत होतं. त्यात त्यांना मजा येत होती. एखादी कलाकृती कशी घडत नाही, एखादं सृजन कसं आकाराला येत नाही याचा आपार आनंद काही मंडळींना होत होता. त्यामुळे नंदू आणखीच नाउमेद होत होता. नंदू काळे मूळ औरंगाबादचा, नाट्यशास्त्रात पदके घेतलेला. ओघानच मुंबई गाठलेला. छोटी-मोठी कामं करत तो अतिशय गाजलेल्या सी.आय.डी. या मालिकेचा दिग्दर्शक झाला. नंदू काळे हे नाव प्रकाशझोतात आलं. सी.आय.डी. ही मालिका सर्वश्रुत आहेच परंतु तो गुन्हेगारी विषयक ऐवज असल्यानं दिग्दर्शकीय कौशल्य पणाला लागत होतं. त्यात तो यशस्वी झाला.

Loading content, please wait...