
सुदर्शन चव्हाण
chavan.sudarshan@gmail.com
‘नारायनींदे मूनानमक्कळ’ तीन भावांची कथा आहे. आईच्या आजारपणानिमित्त ते अनेक वर्षांनी एकत्र येतात आणि एकमेकांबाबतच्या एक एक गोष्टी बाहेर यायला लागतात. दिग्दर्शक इथे कोणाला दोष न देता प्रत्येक पात्राची भूमिका फक्त दाखवत जातो आणि कदाचित तेच या सिनेमाचं सर्वात मोठं यश आहे.
‘नारायनींदे मूनानमक्कळ’मधील मोठा भाऊ विश्वनाथ, मग सेतू आणि भास्कर. विश्वनाथ नोकरीनिमित्त एका शहरात राहतो. सेतू शिक्षणात थोडा कच्चा असल्याने तो घरी आईजवळच राहतो. भास्कर त्याची बायको नफिसासह युकेमध्ये राहतो. आईच्या आजारपणात सेतू मोठ्या आणि छोट्या भावाला घरी बोलावून घेतो; पण सिनेमा तेव्हा वेगवेगळी वळणं घ्यायला लागतो जेव्हा व्हेंटिलेटरवरून काढूनही आई जात नाही...