
नरेश हाळणोर
नाशिक शहराचे विस्तारीकरण झपाट्याने होत आहे. त्या तुलनेमध्ये सार्वजनिक वाहतुकीचे नियोजन ढिसाळ आहे. शिवाय वाहनतळांची व्यवस्था नसल्याने वाहनचालक बेशिस्त झाले आहेत.
गंभीर स्वरुपाचे अपघात होऊनही तात्पुरती मलमपट्टी केली जाते, काही दिवस उलटले की पुन्हा जैसे थे... यामागे प्रशासकीय उदासीनता जशी कारणीभूत आहे, तशीच राजकीय इच्छाशक्तीचाही अभाव वारंवार दिसून आलेला आहे.