
डॉ. सतीश श्रीवास्तव
कोणत्याही देशाच्या प्रगतीचा मूलभूत पाया शिक्षण क्षेत्र असते. जगातील झपाट्याने बदलणारे तंत्रज्ञान, जागतिकीकरण आणि सर्वच क्षेत्रांत असणारी तीव्र स्पर्धा याला सामोरे जाण्यासाठी गुणवत्ता जपणाऱ्या आणि सर्वांना उपलब्ध होऊ शकणाऱ्या शिक्षणाची नितांत गरज असते. कारण शिक्षण, प्रशिक्षण आणि संशोधन हा देशाच्या विकासाचा आणि उन्नतीचा मंत्र असतो. दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी उपयुक्त अशी परिसंस्था निर्माण करणे आवश्यक असते. या दृष्टीने पाहू जाता नाशिक हे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर भारतातील शैक्षणिक संधींचे एक उत्कृष्ट केंद्र, म्हणजेच एज्युकेशन हब निश्चितच होऊ शकते.