

Simhastha Kumbh Mela Development Plan
esakal
रेल्वे, नाशिक विमानतळाच्या विस्तारीकरणाचे नियोजन आहे का? नाशिकरोडबरोबर देवळाली, कसबे-सुकणे, खेरवाडी व ओढा रेल्वेस्थानकांवर प्रवाश्यांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. नाशिकरोड रेल्वेस्थानकाचा विस्तार करण्यासाठी राज्य सरकारने केंद्राला प्रस्ताव पाठविला आहे. तसेच ओझर विमानतळावर प्रवासीक्षमतेत वाढ करण्याच्या दृष्टीनेही पावले उचलण्यात आली आहे. केंद्र सरकारने विमानतळावर नवीन धावपट्टीच्या ऊभारणीसाठी ६०० कोटी रुपये उपलब्ध करून दिले असून, ते काम सुरू झाले आहे. तसेच नव्याने टर्मिनल इमारत उभारणीसाठी प्राधिकरणाच्या माध्यमातून ५५० कोटी रुपये प्रस्तावित केले आहेत. या निधीतून अन्य सुविधांची निर्मिती केली जातील. त्यामुळे भविष्यात तासाला एक हजार प्रवाशांचा समन्वय केला जाईल.
दर बारा वर्षांनी भरणाऱ्या नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या माध्यमातून नाशिकच्या सर्वांगीण विकासाची सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. या संधी प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यासाठी शासन-प्रशासनाने पावले उचलली आहेत. सिंहस्थ अमृतकुंभामधून नाशिक जिल्ह्यासाठी कायमस्वरूपी पायाभूत सुविधांच्या निर्मितीला गती देतानाच कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांना धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनाची अनुभूती देण्यासाठी सर्व यंत्रणा एकत्रित प्रयत्न करत आहेत. विकासकामांचे नियोजन करताना गुणवत्ता अन् गुणवत्तेचे कटाक्षाने पालन करण्यात येणार असल्याची माहिती नाशिकचे विभागीय आयुक्त आणि नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांनी ‘सरकारनामा’चे प्रतिनिधी गौरव जोशी यांच्याशी संवाद साधताना दिली.