National Army Day 2025 Opinion: अस्तनीतले निखारे! बाहेरच्या शत्रूपेक्षा देशांतर्गत छुपे शत्रू अधिक धोकादायक
Indian Army, Navy, Airforce: देशासाठी सर्वस्व झोकून देत सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या संस्थांपैकी अग्रगण्य संस्था म्हणजे लष्कर, हवाई दल आणि नौदल या संरक्षणसंस्था. देशाचे संरक्षण दल पूर्णपणे राजकीय महत्त्वाकांक्षारहित आहे.
Chief of Defence Staff General Anil Chauhan, Chief of Army Staff General Upendra Dwivedi, Chief of the Naval Staff Admiral Dinesh K. Tripathi and Vice Chief of Air Staff Air Marshal Sujeet Pushpakar Dharkar pay tribute at the National War Memorial ahead of the 77th Army Day celebrations, in New Delhi(PTI Photo/Manvender Vashist Lav)
स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी स्वतःचे सर्वस्व देणाऱ्या आपल्या जवानांचा सन्मान करा. किमान एवढी गोष्ट तर आपण सर्वजण नक्की करू शकतो. आपला ‘भविष्यकाळ’ सुरक्षित राहण्यासाठी ते त्यांचे ‘वर्तमान’ तुम्हाला देत आहेत. यंदाचा ‘लष्कर दिवस’ १५ जानेवारीला पुण्यात साजरा होत आहे.