
OBC Maratha reservation
esakal
डॉ. बबनराव तायवाडे
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीविरोधात नागपूरमध्ये सहा दिवसांपासून सुरू असलेल्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या आंदोलनाची सांगता झाली. राज्याचे ओबीसी विकास मंत्री अतुल सावे यांनी आमची भेट घेत महासंघाच्या चौदापैकी बारा मागण्या तत्काळ मान्य केल्या.
सोबतच हैदराबाद गॅझेटमुळे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नसल्याचे आश्वस्त केल्यानंतर आमच्या ओबीसी महासंघाने साखळी उपोषण स्थगित केले. आम्ही लपूनछपून मंत्र्यासोबत चर्चा केलेली नाही. १२ मागण्या मान्य झालेल्या आहेत. काही अडचणी आल्यातर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या उपसमितीकडे मांडू. ओबीसींच्या हक्कांवर कधी गदा आली तर तेवढ्याच ताकदीने लढा देऊ.