
डॉ. संतोष दास्ताने
नैसर्गिक संकटांशी झगडणे याला राज्यांनी सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे. केंद्र सरकार, राज्य सरकारे व स्थानिक स्वराज्य संस्था या सर्व स्तरांवरील अधिकार मंडळांनी एकसूत्रतेने आणि सामंजस्याने धोरण आखणे आणि त्यावर अंमलबजावणी करणे याला आता अग्रक्रम द्यायला हवा.
जा गतिक पातळीवरील ‘जर्मनवॉच’ ही स्वायत्त संस्था ‘आंतरराष्ट्रीय हवामान जोखीम निर्देशांक २००६पासून नियमितपणे प्रसिद्ध करते. सन २०२५च्या अहवालानुसार नैसर्गिक आपत्तींचा जबर फटका बसणाऱ्या देशांच्या यादीत भारताचा १७१ देशांमध्ये सहावा क्रमांक आहे. २०२२ मध्ये भारताचा सातवा क्रमांक होता.