

Bihar Election Analysis 2025
esakal
निवडणुकीत एका राजकीय पक्षाला किंवा आघाडीला प्रचंड बहुमत मिळण्यामागे अनेक घटक जबाबदार असतात. नुकत्याच बिहारमध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) मिळालेल्या ऐतिहासिक विजयाच्या बाबतीतही हे तंतोतंत लागू पडते. या विजयातून दोन महत्त्वाचे संदेश मिळत आहेत. पहिला म्हणजे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी ‘एनडीए’ सरकारच्या कामगिरीला मतदारांनी दिलेली ठोस मान्यता दिली आहे. अन् दुसरा संदेश म्हणजे या निवडणुकीत प्रचारादरम्यान ‘एनडीए’नं दिलेल्या आश्वासनांवर मतदारांनी पुन्हा एकदा विश्वास टाकत मोठाट सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.