Premium|Overcoming Cognitive Traps in Investment Management : भावनांचा खेळ की तर्काचा अभाव? जाणून घ्या काय आहे ‘निग्लेक्ट ऑफ प्रोबॅबिलिटी बायस’

Neglect of Probability Bias Definition Examples : आपण रोज शेकडो निर्णय घेताना खरोखरच तर्काचा वापर करतो की भावनांच्या आहारी जातो? निर्णयप्रक्रियेत संभाव्यतेचा विचार न करता मानसिक सापळ्यात अडकवणाऱ्या 'निग्लेक्ट ऑफ प्रोबॅबिलिटी बायस' या मानसिकतेचे सविस्तर विश्लेषण.
Premium|Overcoming Cognitive Traps in Investment Management : भावनांचा खेळ की तर्काचा अभाव? जाणून घ्या काय आहे ‘निग्लेक्ट ऑफ प्रोबॅबिलिटी बायस’
Updated on

अभिजित कोळपकर - abhijeetjk.ca@gmail.com

आपण रोज शेकडो निर्णय घेतो- काही छोटे, काही आयुष्य बदलणारे. पण हे निर्णय घेताना आपण खरोखरच ‘तर्क’ वापरतो का? की नकळत आपल्या भावना, भीती आणि लोभ आपल्या विचारांवर राज्य करत असतात? आश्चर्याची गोष्ट म्हणजे, अनेकदा आपण ‘किती शक्यता आहे?’ हा सर्वांत महत्त्वाचा प्रश्नच विचारत नाही. परिणाम किती मोठा असेल- फायदा किंवा नुकसान- याच्या प्रभावाखाली आपण त्या घटनेची वास्तविक शक्यता पूर्णपणे दुर्लक्षित करतो. हाच तो सूक्ष्म; पण धोकादायक मानसिक सापळा- ‘निग्लेक्ट ऑफ प्रोबॅबिलिटी बायस’, जो आपल्या आर्थिक आणि वैयक्तिक निर्णयांवर खोलवर परिणाम करतो. त्याचा घेतलेला वेध...

विमानाने प्रवास करताना आपल्या सर्वांच्या मनात विचार येत असतो की, ‘‘हे विमान सुरक्षित असेल ना?’’ आपण मनाची समजूत घालतो, की रोज हजारो लोक प्रवास करतात, तू उगाच घाबरू नकोस. इतिहासात विमान अपघात झाले आहेत, हे आपल्याला माहीत असते. तरीही आपण निर्धास्तपणे विमानप्रवास करतो, कारण आपण शक्यतेचा विचार करत असतो. एका आकडेवारीनुसार, विमान अपघात होण्याची शक्यता एक कोटी विमानउड्डाणांमध्ये एक इतकी कमी आहे. शक्यता शून्य नाही; पण ती इतकी नगण्य आहे, की आपला मेंदू त्या शक्यतेकडे सहज दुर्लक्ष करतो. जेव्हा एखाद्या घटनेची शक्यता खूपच कमी असते, तेव्हा आपण ती पूर्णपणे दुर्लक्षित करतो. यामुळे अनेकदा नुकसान होते. या पूर्वग्रहाला ‘निग्लेक्ट ऑफ प्रोबॅबिलिटी’ (Neglect of Probability Bias) असे म्हणतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com