
Education driven economic growth
esakal
देशाचा आर्थिक विकास व विकसित देशाच्या अनुषंगाने जी उद्दिष्ट्ये ठरविण्यात आली आहेत. ती साध्य करण्यात शिक्षण क्षेत्राचा कसा उपयोग करता येऊ शकतो, या दृष्टीने राष्ट्रीय शिक्षण धोरणाकडे पहिल्यांदाच पाहिले गेले. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने २०२० ला हे राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० ला लागू केले. त्याला या वर्षी पाच वर्षे पूर्ण होत आहेत. या धोरणाच्या परिपूर्ण अशा अंमलबजावणीने विकसित देश म्हणून आपले उद्दिष्ट साध्य होऊ शकते.
भारतामध्ये पहिल्यांदाच उच्च शिक्षणाचा संबंध देशाच्या आर्थिक विकासाशी लावला गेला आहे. एकविसाव्या शतकामध्ये भारताने आर्थिक विकासाशी आणि विकसित भारताशी निगडित जी उद्दिष्टे ठरवलेली आहेत त्यांच्या पूर्ततेसाठी शिक्षणाचा एक साधन म्हणून कशा पद्धतीने उपयोग करता येईल, या दृष्टिकोनातून पहिल्यांदाच शिक्षणक्षेत्राकडे पाहिले जात आहे.
भारताच्या अर्थव्यवस्थेचा सध्याचा आकार येत्या काळात तो पाच ट्रिलियन डॉलर्सवर नेण्याचा संकल्प भारताने केला आहे. जागतिक क्रमवारीमध्ये भारतीय अर्थव्यवस्था आज चौथ्या स्थानावर आहे. अलीकडेच आपण इंग्लंडला आणि जपानला मागे टाकले आहे. भारताच्या पुढे आता जर्मनी, चीन आणि अमेरिका हे तीन देश आहेत. २०३० पर्यंत तिसऱ्या स्थानापर्यंत झेप घेण्याचे उद्दिष्ट भारताने ठेवले आहे. यासाठी किमान आठ ते नऊ टक्के दराने आपल्या अर्थव्यवस्थेचा विकास होणे आवश्यक आहे.