Premium|Nepal Glacial Flood : हिमनदी कोसळली, हजारो टन बर्फ-दगडांचा लोंढा आणि शेकडो जीव गिळणारा प्रलय

Glacier Collapse in Nepal : तिबेटमधील हिमतलाव आणि हिमनद्यांच्या हालचालींमुळे नेपाळमध्ये अचानक पूर आणि दरडींचा धोका वाढला आहे. वेळेवर माहिती न मिळाल्यास हिमालयीन भागातील गावांसमोर मोठं संकट निर्माण होऊ शकतं.
Nepal Glacial Flood

Nepal Glacial Flood

esakal

Updated on

डॉ. प्राक्तन वडनेरकर - sakal.avtaran@gmail.com

तज्ज्ञांनी इशारा दिला होता, की तिबेटमधील अनेक धोकादायक हिमतलाव नेपाळच्या थेट डोक्यावर आहेत. जर तिथे काही घडलं तर त्याची माहिती वेळेवर खालच्या भागात पोहोचवणं अवघड आहे. कारण औपचारिक डेटा शेअरिंग करारच या हिमालयातील देशांमध्ये अस्तित्वात नाही.

नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात सर्वसामान्य बुधवार, २६ ऑगस्टचा दिवस उजाडत होता. भोटेकोशी नदीकाठची गावं नेहमीसारखीच जागी होत होती आणि नेमक्या त्याच क्षणी जमिनीखाली काहीतरी हादरलं. भूकंपमापक यंत्रांनी रिश्टर स्केलवर ५.२ इतक्या तीव्रतेची नोंद केली; पण काही तासांतच शास्त्रज्ञांनी हा अंदाज मागे घेतला... हा भूकंप नव्हता; तर एका हिमनदीचा तुकडा जो डोंगरमाथ्यावरून खाली कोसळला होता.

उपग्रह छायाचित्रांची तुलना केल्यावर शास्त्रज्ञांना जे दिसलं ते अंगावर काटा आणणारं होतं. जवळपास दोन हजार फूट रुंदीचा हिमनदीचा एक अख्खा तुकडा आपल्या जागेवरून निखळून थेट लेंधे खोला नदीत (भोटेकोशी नदीची उपनदी) जाऊन कोसळला आणि हे घडत असतानाच त्याच डोंगरउतारावर एक भूस्खलनही झालं. काही मिनिटांतच हजारो टन बर्फ आणि दगड-मातीचा प्रचंड लोंढा घेऊन डोंगरावरून दरड कोसळली. नदीचा प्रवाह क्षणार्धात अडवला गेला आणि मग तितक्याच वेगाने तो बांधही फुटला. जे पाणी सामान्यतः तासन्-तास वाहत खाली येतं,

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com