
Nepal political stability
esakal
कल्याणी शंकर
नेपाळमधील राजकीय अस्थिरतेनंतर सुशीला कार्की यांच्याकडे पंतप्रधानपदाची धुरा देण्यात आली आहे. त्यांना नेपाळमधील सैन्यासह ‘जेन-झी’चा पाठिंबा आहे. नेपाळमध्ये शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित होणे हे केवळ त्या देशासाठीच नव्हे, तर संपूर्ण उपखंडाच्या स्थैर्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. हंगामी सरकारच्या काळात तेथे शांतता आणि स्थैर्य नांदून पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीचा मार्ग सुकर होणे आवश्यक आहे.
सरकारविरोधी तीव्र आंदोलनांनंतर आणि जोरदार धुमश्चक्रीनंतर नेपाळने नव्या पंतप्रधानांचे स्वागत केले असून, देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे. सुशीला कार्की यांनी नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. माजी न्यायाधीश असलेल्या कार्की यांना ‘जेन-झी’चाही पाठिंबा मिळाला असून, पंतप्रधानपदाच्या कार्यालयात त्या रुजू झाल्या आहेत.