

Online shopping psychology
esakal
नोटिफिकेशन आलं म्हणून फोन हातात घेतला आणि एक तासभर मोबाइल स्क्रोल करत राहिलो असं तुमच्या बाबतीत सुध्दा होतं का? असं झालं की आपण स्वत:ला दोष देतो. पण यात पूर्णपणे तुमची चुकी नसते तर तुम्ही एका सापळ्यात अडकलेले असता. यासाठी या कंपन्या न्यूरोमार्केटिंगचे तंत्र वापरतात. यामध्ये तुमच्या मेंदूमधील रिवॉर्ड सिस्टिमचा अभ्यास केला जातो. कधी न्युक्लिअस अक्युम्बन्स, कधी अमिग्डाला तर कधी हिप्पोकॅम्पस या मेंदूच्या भागाला टारगेट करून एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी तुम्हाला भाग पाडले जाते. म्हणून तुम्ही अॅमॅझॉन, फ्लिपकार्टच्या वेबसाईटवर एखादी बेस्टसेलर, अॅमॅझॉन चॉईस असे टॅग असणारी वस्तू असेल तर लगेच खरेदी करता किंवा स्विगी, झोमॅटोवर झिरो डिलेवरी फी, झिरो प्लॅटफॉर्म फी, ५०% ऑफ अशा ऑफर दिसल्या तर फिअर ऑफ मिसिंग आऊटमुळे खरेदी करायची घाई करता.
या कंपन्या न्यूरोमार्केटिंगचा उपयोग जेव्हा लहान मुलांवर करतात तेव्हा मात्र ही गोष्ट अजूनच धोकादायक बनते. कारण या मुलांची निर्णय घेण्याची क्षमता पुर्णपणे विकसित झालेली नसते त्यामुळे या मुलांना डिजिटल स्वरूपातील व्यसन लवकर लागू शकतं. परदेशात ४ हजार झालेल्या संशोधनानुसार जी मुले डिजिटल व्यसनांच्या आहारी गेली होतीत, त्या मुलांच्या मनात स्वत:ला संपवण्याचा विचार सातत्याने येत होता.
त्यामुळे न्यूरोमार्केटिंगचा हा ट्रॅप कसा ओळखायचा अशा गोष्टींपासून बचावासाठी काय करायचं? मेंदूमधील कोणते भाग आपल्या निर्णय प्रक्रियेवर परिणाम करतात? आणि हा परिणाम कसा होत असतो? हे प्रत्येकाला माहित असायला हवं. हे माहित करून घेऊयात सकाळ+च्या या लेखातून.