मुंबई : चीनमधील युनान इन्स्टिट्यूट ऑफ एंडेमिक डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनचे गुओपेंग कुआंग आणि डाली युनिव्हर्सिटीचे टियान यांग यांच्या नेतृत्वाखालील एका शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासात, वटवाघळांच्या किडनीमध्ये आढळणाऱ्या विषाणूंबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या संशोधनामुळे वटवाघळांपासून मानवामध्ये रोग पसरण्याचा नवा धोका आता निर्माण झाला आहे.
शास्त्रज्ञांच्या मते वटवाघळे फळबागांच्या जवळ राहत असल्याने मानवामध्ये या विषाणुंचा संसर्ग होण्याची शक्यता वाढली आहे. हे विषाणू दूषित फळे, पाणी किंवा थेट संपर्कातून माणसांमध्ये पसरू शकतात. थोडक्यात, वडवाघळांमधील हे विषाणू मानवी आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण करू शकतात, ज्यामुळे त्यांच्यावर अधिक संशोधन करणे गरजेचे आहे.