Premium|New EPF Scheme 2026 : नवी ईपीएफ योजना लागू; पीएफ, पेन्शन आणि पैसे काढण्याच्या नियमांत झाले मोठे बदल

Social Security Code 2020 : सामाजिक सुरक्षा संहिता, २०२० अंतर्गत नव्या ईपीएफ योजनेमुळे कर्मचारी योगदान, निधी काढणे, पेन्शन दावे आणि डिजिटल अनुपालनाच्या प्रक्रियेत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.
Social Security Code 2020

Social Security Code 2020

esakal

Updated on

डॉ. दिलीप सातभाई - dvsatbhaiandco@gmail.com

देशातील जुने कामगार कायदे (१९५२ चा कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी आणि इतर तरतुदी अधिनियम यासह) एकत्र करून सामाजिक सुरक्षा संहिता, २०२० तयार करण्यात आली. त्यानुसार, कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी (ईपीएफ) आणि संकीर्ण उपबंध अधिनियम, १९५२ अंतर्गत तयार करण्यात आलेली कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी योजना, १९५२ रद्द करून, नव्या संहितेशी सुसंगत नवी योजना अधिसूचित करण्यात आली आहे. कामगार आणि रोजगार मंत्रालयाने २९ जून २०२६ रोजी ही नवी योजना अधिसूचित केली आहे. या महत्त्वाच्या बदलांवर टाकलेला हा प्रकाशझोत...

देशातील जुने कामगार कायदे (१९५२ चा कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी आणि इतर तरतुदी अधिनियम यासह) एकत्र करून सामाजिक सुरक्षा संहिता, २०२० तयार करण्यात आली. सामाजिक सुरक्षा संहितेअंतर्गत डिजिटल अनुपालन, निधी काढण्याचे सुलभ नियम, जलद पेन्शन दावे आणि अद्ययावत कर्मचारी पेन्शन योजना (ईपीएस) तरतुदी लागू करण्यात आल्या आहेत. योगदान, दावे आणि लेखापरीक्षण यांचे संपूर्ण डिजिटलीकरण, निधी काढण्याच्या प्रक्रियेचे सुलभीकरण, जबाबदाऱ्या आणि दंडाच्या कालमर्यादा स्पष्ट करणे, तसेच गिग, कंत्राटी आणि आंतरराष्ट्रीय कामगारांसाठी स्पष्ट व्याख्या व द्विपक्षीय सामाजिक सुरक्षा करारांच्या तरतुदींचा समावेश करून पूर्वीच्या अनेक त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

किती लोकांना फायदा?

या नव्या योजनेचा लाभ सुमारे आठ कोटी कर्मचाऱ्यांना होणार असून, या योजनेअंतर्गत जवळपास २८ लाख कोटी रुपये जमा आहेत. संहितेच्या तिसऱ्या अध्यायांतर्गत येणाऱ्या जवळपास सर्व आस्थापनांचा (पूर्वीच्या १९५२ च्या अधिनियमाच्या कक्षेतील) यात समावेश होतो. तसेच, अन्य कोणत्याही पेन्शन योजनेखाली न येणाऱ्या काही सरकारी व राज्य-नियंत्रित आस्थापनांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com