
GST reform auto sector
esakal
सुधन्वा कोपर्डेकर
‘जीएसटी’तील सुधारणा ही वाहन उद्योगासाठी मोठी संधी आहे. सुटे भाग पुरवणाऱ्या कंपन्या, वाहन उत्पादक, डीलर्स, कच्चा माल पुरवठादार आणि ग्राहक या सर्वांना काही ना काही स्वरूपात लाभ मिळू शकतो. मात्र, पोलाद अन् इतर कच्च्या मालाच्या किमती, करक्रेडिटवरील संभ्रम, सवलतीचे संतुलन यांसारखे काही मुद्दे सरकारने वेळीच सोडवले तर या सुधारणांचा परिणाम अधिक सकारात्मक होईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाच्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात भारतीयांना एक मोठी भेट लवकरच मिळेल असे सूतोवाच केले होते. वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) परिषदेच्या ५६ व्या बैठकीत वस्तू आणि सेवा कराच्या दरात सुसूत्रता आणून आता बहुतांश वस्तू पाच आणि १८ टक्के या दरात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.