

New Labour Codes India 2020
esakal
केंद्र सरकारने पूर्वीचे २९ कामगार कायदे संपुष्टात आणून चार नवे कामगार कायदे तयार केले आहेत. त्यानुसार पूर्वीच्या कायद्यामधील बहुसंख्य तरतुदी नवीन कायद्यामध्ये कायम ठेवल्या आहेत. काही तरतुदींचा क्रम व नावे बदलून त्या नव्याने तयार केल्याचे भासविले आहे. म्हणून फक्त बदललेल्या अथवा नव्याने तयार केलेल्या तरतुदींचा विचार करणे योग्य ठरेल. सामाजिक सुरक्षेच्या म्हणजे पूर्वीच्या भविष्य निर्वाह निधी, राज्य कामगार विमा योजना, ग्रॅच्युइटी, बाळंतपणातील फायदे, कामगार नुकसानभरपाई, असंघटीत कामगारांच्या सुरक्षतेच्या तरतुदी या पूर्वीच्या बहुसंख्य बाबींचा समावेश नवीन कायद्यामध्ये आहे. असंघटीत कामगारांना सर्व कामगार कायदे लागू केल्याचे जाहीर केले आहे. परंतु त्यातील नेमक्या योजनांच्या नवीन तरतुदी नमूद केलेल्या नाहीत.