
राजू शेट्टी
इंग्रजांनी त्यांच्या राजवटीच्या काळात भारतामध्ये १९०४, १९१२, १९२५ या वर्षांमध्ये सहकारासंबधी काही कायदे केले. सदरचे कायदे बॅंकिंग, कापड उद्योग व शेती मालाचा व्यापार विक्री व प्रक्रिया यापुरते मर्यादित होते.
कर्नाटक राज्यातील गदग जिल्ह्यात कानगिनाहल या गावात ८ जुलै १९०५ रोजी श्री सिद्धनगौडा सन्नारामनगौडा पाटील यांच्या नेतृत्वाखाली कानगिनाहलच्या ग्रामस्थांनी दोन हजार रुपयांच्या सुरुवातीच्या भागभांडवलाने पहिल्या सहकारी कृषी पतसंस्थेची १९०४ च्या सहकारी कायद्यांतर्गत स्थापना झाली. ही संस्था सुरू केली.