

Heart disease risk
esakal
बऱ्याचदा आपल्या शरीरात अनेक बदल होत असतात आणि आपल्याला त्याची कल्पना सुध्दा नसते. एलडीएलमुळे निर्माण होणारा ह्रदयविकार हा एक तसाच आजार आहे. सुरवातीच्या काळात आपल्याला काही जाणवतही नाही, वेदना होत नाही, कोणतीही मोठी लक्षणे दिसत नाहीत. पण आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये वाईट कोलेस्टेरॉलचे थर वाढत असतात. आणि आपले शरीर ह्रदयविकाराच्या दिशेने वाटचाल करत असते.
जंक फूड, पॅकेज्ड पदार्थ, तळलेले पदार्थ, दारू, सिगारेट व्यायामाचा अभाव या गोष्टींमुळे हे बॅड कोलेस्टेरॉल वाढत जाते. परंतू आश्चर्याची गोष्ट म्हणजे सगळे नियम पाळून सुध्दा फक्त अनुवंशिकतेमुळे काही लोकांना या आजारामुळे आपला जीव गमवावा लागतो. हे बॅड कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय म्हणजे PCSK9 इनहिबिटर्स ही उपचार पध्दत. परंतू या उपचार पद्धतीमधील सर्वात मोठी अडचण म्हणजे या पद्धतीत रूग्नांना नियमित इंजेक्शनने हे औषध घ्यावे लागते. ही इंजेक्शन महाग असतातच पण त्याच बरोबर ज्या गावांपासून दवाखानेच शेकडो किमी अंतरावर आहेत त्या लोकांना हे उपचार आत्तापर्यंत घेताच येत नव्हते. परंतू आता या समस्येवर तोडगा निघाला आहे. एनलिसिटाइड या गोळीच्या यशस्वी चाचणीमुळे आता इंजेक्शनचे काम गोळीमुळे होणार आहे. ही गोळी कोणासाठी आणि कितपत फायद्याची ठरू शकते? या संशोधनाचे महत्त्व काय हे सगळं जाणून घ्या सकाळ+ च्या या लेखातून