
Educate Girls NGO
esakal
सफीना हुसेन
गरिबी, पितृसत्ताक व्यवस्था आणि धोरण हे तीन घटक मुलींच्या शिक्षणातील सर्वांत मोठे अडथळे आहेत... मुलींच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या ‘एज्युकेट गर्ल्स’ या चळवळीमागचा विचार आणि कार्यपद्धती यांविषयीचे विवेचन. या संस्थेला सामाजिक कामासाठी नुकताच ‘मॅगसेसे’ पुरस्कार मिळाला.
शि क्षण अर्ध्यातच सोडावं लागल्यामुळं येणारं अपूर्णत्व नेमकं काय असतं, हे मी जाणते. दिल्लीमध्ये जन्मले असले तरीसुद्धा बारावीनंतर माझंही शिक्षण थांबलंच होतं; पण काकूनं दिलेल्या प्रोत्साहनामुळं ते पूर्ण करता आलं. त्या पाठबळावरच ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’सारख्या प्रथितयश संस्थेमध्ये शिकण्याची संधी मिळाली. त्यानंतर स्वयंसेवी संस्थांचे काम कसं चालतं, याचं शिक्षण विविध देशांत घेता आलं.