
Ethanol blending politics
esakal
सुनील चावके
इथेनॉल मिश्रणाच्या बाबतीत कायम आग्रही राहिलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ‘पेट्रोल-डिझेल विक्रेत्यांच्या लॉबीने माझ्याविरुद्ध पेड मोहीम चालविली,’ असा थेट आरोप केला आहे. इथेनॉल निर्मितीतील वाढ ‘पेट्रोल लॉबी’साठी धक्कादायक ठरू शकते. वेगवेगळे प्रवाद पसरविण्यामागे या लॉबीचे हितसंबंध आहेत.
पे ट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. इथेनॉल मिश्रणाच्या बाबतीत कायम आग्रही राहिलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ‘‘पेट्रोल-डिझेल विक्रेत्यांच्या लॉबीने आपल्याविरुद्ध पेड मोहीम चालविली,’’ असा थेट आरोप केला आहे. गडकरी यांचे राजकीय हितशत्रू त्यांना लक्ष्य करीत असताना एक हजार कोटी लिटर वार्षिक उत्पादनक्षमता गाठणाऱ्या इथेनॉलनिर्मितीत गुंतलेल्या शेतकऱ्यांच्या अर्थकारणावरही प्रश्नचिन्ह लागणार आहे.